Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : राहू बेट परिसरात दोन बकऱ्यांचा बिबट्याने पाडला फडशा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 25 September 2023, 18:56

Daund News : राहू : राहू बेट (ता. दौंड) परिसरात बिबट्याने दहशत माजविली असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रविवारी (ता. २४) मध्यरात्रीच्या सुमारास वडगाव बांडे-राहू शिव रस्त्यावरील भाऊ बाळू मोटे यांच्या दोन बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. दोन दिवसांपूर्वी राहू नजिक एका बाजरीच्या शेतात बिबट्या वावरताना शेतकऱ्यांनी पाहिला. या परिसरात पिंजरा लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. मात्र, पिंजरा लावण्यास वन विभागाकडून सोयीस्कररित्या टाळाटाळ केली जात असल्याची परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.

पिंजरा लावण्यास वन विभागाकडून टाळाटाळ

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्याची मागणी राहूचे सरपंच दिलीप देशमुख, वडगाव बाड्यांच्या सरपंच श्रद्धा मेमाणे, पाटेठाणच्या सरपंच उषा पिंपळे, पिलानवाडीच्या सरपंच वैशाली डुबे, उंडवडीच्या सरपंच दीपमाला जाधव, वाळकीच्या सरपंच ज्योती थोरात, नाथाचीवाडीच्या सरपंच सारिका चोरमले, पिंपळगावच्या सरपंच शुभांगी पासलकर, खामगावचे सरपंच योगेश मदने, नांदूरचे सरपंच युवराज बोराटे, (Daund News) दहिटण्याच्या सरपंच आरती गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. मात्र, पिंजरा लावण्यास टाळाटाळ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बिबट्याचे मनुष्यवस्तीत दर्शन होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. येथील सोनवणे मळा परिसरात देखील सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे. शेतामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे शेतकऱ्यांना आढळून आले आहेत. राहू-वाघोली रस्त्याच्या कडेला बिबट्या वावरताना दिसला. गाडीच्या उजेडामुळे त्याने उसाच्या शेताकडे धूम ठोकली. (Daund News) यापूर्वी राहू परिसरामध्ये अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करत फस्त केले. शेतात काम करत असताना शेतमजुरांना तसेच ग्रामस्थांना अचानक बिबट्या दिसत आहे.

 

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ग्रामपंचायतीने कागदपत्रांची वन विभागाच्या कार्यालयाकडे पूर्तता करून देखील, तातडीने पिंजरा लावला जाईल, असे फक्त आश्वासन मिळत आहे. (Daund News) प्रत्यक्षात कारवाई होत नाही. नागरिकांनी सतर्क रहा, घराभोवताली विजेचे दिवे चालू ठेवा, अधून-मधून फटाके वाजवा, बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये, असे आव्हान वन विभागाने केले आहे.

दरम्यान, दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, परिसराची तातडीने पाहणी करून पिंजरा लावण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला कळवले जाईल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : शेतकरी करतोय हजारो एकरांतील टोमॅटो उद्ध्वस्त

Daund News : खुटबाव ग्रामस्थांनी १० वर्षांपासून जपलीय ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा!

Daund News : खोरवडी जिल्हा परिषद शाळेत आजी आजोबा पूजन दिन उत्साहात साजरा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pachgani News : पुस्तकांचे गाव भिलार येथे भुरट्या चोरीचे वाढतंय प्रमाण; सीसीटीव्ही बंद पडल्याचा चोरटे घेताहेत फायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.