Loni Kalbhor : लोणी काळभोर : मांजरी (ता. हवेली) येथील वेताळबाबा गणपती मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या आवाजावरून एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड सदृश्य वस्तू मारल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २४) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एका फरार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
दोघांना अटक, एक फरार
हर्षल सुरेश घुले व केतन घुले (दोघेही, रा. मांजरी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर स्वप्निल ऊर्फ बिबट्या संजय कुचेकर (वय २२, रा. मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.(Loni Kalbhor) याप्रकरणी बाळासाहेब घुले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल ऊर्फ बिबट्या कुचेकर याचे मांजरी येथे वेताळबाबा गणपती मंडळ आहे. त्याच्या मंडळाची रविवारी विसर्जन मिरवणूक निघाली होती. (Loni Kalbhor) या वेळी आवाजावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांचा बाळासाहेब घुले यांच्याशी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास किरकोळ वादविवाद झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी बाळासाहेब घुले यांच्यावर रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास लोखंडी रॉड सदृश्य वस्तू डोक्यात मारून जखमी केले.
याप्रकरणी बाळासाहेब घुले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Loni Kalbhor) गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी हर्षल सुरेश घुले व केतन घुले याला अटक केली आहे. तर आरोपी बिबट्या कुचेकर हा फरार झाला आहे. हडपसर पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor : लोणीकाळभोरचे अंबरनाथ गणेश मंडळ देतेय चलचित्रातून सामाजिक संदेश
Loni Kalbhor News : एंजल हायस्कूलच्या यश काळभोर याची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड..