गणेश सुळ
Daund News : केडगाव : गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ हा व्हिडिओ यंदा प्रचंड गाजला. आता ‘शेतकऱ्याची व्यथा’ मांडणारा व्हिडिओ समोर येत आहे. “आमच्या पप्पांनी टोमॅटो लावला, आयशी आणि शंभर, कॅरेट जाते एक नंबर, आमच्या पप्पांनी टोमॅटो लावला, कसा वाकू-वाकू तोडतोय चांगला…” टोमॅटोला चांगला दर मिळाल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत चार पैसे पदरी पडतील, अशी आशा मनी ठेवून शेतकऱ्याने टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र, बजेटच्या नावाखाली टोमॅटो दरवाढीचा राष्ट्रीय प्रश्न केला गेला. महिन्याकाठी दोन-तीन किलो लागणाऱ्या टोमॅटोने अर्थकारण धोक्यात आल्याची अफवा उठवली. दोनशे रुपयांवर गेलेले दर सद्य:स्थितीत खाली आल्याने, कवडीमोल भावात टोमॅटोची विक्री करावी लागत आहे.
अर्थकारण धोक्यात
पारंपरिक शेतीबरोबरच शेतकरी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी फळे, भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. मात्र, शेतमाल बाजारात दाखल होताच, शेतमालाचे बाजारभाव गडगडतात. शेतमालाला कवडीमोल भाव मिळतो. समाधानकारक भाव मिळाला नसला, तरी नाईलाजाने तो विक्रीही करतो. (Daund News) दुसरीकडे मात्र किरकोळ बाजारात त्याची अधिक दराने विक्री केली जाते. परिणामी रासायनिक खतांचा बाजारभाव व शेतीमालाला मिळणारा बाजारभाव याचे गणित जुळत नाही. यावर मात्र कोणी बोलण्यास तयार नाही, अशी खंत विविध ठिकाणच्या उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
जुलै, ऑगस्ट महिन्यात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली होती. दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो दराने विक्री होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळत होता. (Daund News) मात्र, हे दर कमी होत पाच-सहा रुपयांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकरी अडचणीत
पारंपरिक शेतीबरोबरच फळे, पालेभाज्यांचे उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिक स्रोत वाढविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तालुक्यात काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. यासाठी मशागत, लागवड खर्च, औषध फवारणी यासह तोडणी, बाजारपेठेत येण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च पाहता सध्या मिळत असलेला दर यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Daund News) टोमॅटो शेती करताना मशागत, तोडणी ते बाजापेठेत शेतमाल आणेपर्यंत खर्च करावा लागतो. दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता; पण आता भाव खूपच कमी झाले आहेत.– राजेंद्र जाधव (खुटबाव), टोमॅटो उत्पादक शेतकरी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : खुटबाव ग्रामस्थांनी १० वर्षांपासून जपलीय ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा!
Daund News : खोरवडी जिल्हा परिषद शाळेत आजी आजोबा पूजन दिन उत्साहात साजरा
Daund News : केडगाव रस्त्याची दुरावस्था; रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे लोकप्रतिनिधींना साकडे