अरुण भोई
Daund News : दौंड : खोरवडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी आजोबा पूजन दिन शनिवारी (ता.२३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी आपापल्या आजी-आजोबांना शाळेत बोलाविले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे पाय धुवून मनोभावे ओवाळून दर्शन घेतले.
उपस्थितांपैकी आजोबा श्री शिवाजी सोनवणे यांनी नातवंडे म्हणजे जणू “दुधावरची साय ” असे म्हणत आजी- आजोबा व नातवंडे यांच्यातील तरल नात्याचा पटच सर्वांसमोर उभा केला. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात घरात मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी वयस्कर माणसांचे किती महत्व आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. (Daund News) हे ऐकत असताना सर्वजण काही क्षण निश्चितच भावनाप्रधान झाले होते.
मुलांनी बनविलेल्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन
दरम्यान, शाळेत च गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुलांनी स्वतः बनविलेल्या गणेशमूर्तींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. (Daund News) यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शितलताई सोनवणे यांनी स्वतः बनवून आणलेल्या मोदकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गणेश शिल्प साकारलेल्या मुलांना बक्षीसवाटप करण्यात आले.
यावेळी खोरवडीचे माजी उपसरपंच जालिंदर खोमणे , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शितल सोनवणे, माजी अध्यक्ष गोरख सोनवणे अप्पासाहेब जाधव ,(Daund News) नीता भद्रे, साक्षी कोंडेजकर, शितल कदम, आजी-आजोबा,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अभिजीत कोंडेजकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक गौतम कांबळे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : केडगाव रस्त्याची दुरावस्था; रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे लोकप्रतिनिधींना साकडे