नवी दिल्ली : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये 64 जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
एकूण पदसंख्या किती?
या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 64 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये फिजिओथेरपिस्ट, उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक (फिजियोलॉजिस्ट), उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक (मानसशास्त्रज्ञ), उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक (बायोमेकॅनिक्स), उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक (पोषण तज्ञ), उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक (बायोकेमिस्ट) यांसारखी पदे भरली जाणार आहेत.
संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण
काय असावी शैक्षणिक पात्रता?
फिजिओथेरपीमध्ये बॅचलर पदवी किंवा समतुल्य, स्पोर्ट्स आणि एक्सरसाइज सायन्स / स्पोर्ट्स सायन्स / स्पोर्ट्स कोचिंग आणि एक्सरसाइज सायन्स / शारीरिक शिक्षण / डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग किंवा समकक्ष पदवी.
किती मिळू शकतो पगार?
105000 रुपयांपर्यंत तुम्हाला पगार मिळू शकतो.
अर्ज शुल्क किती?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराला यासाठी कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2023
कुठं करावा अर्ज – अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.sportsauthorityofindia.nic.in ला भेट द्यावी.