मुढंवा (पुणे)- आईने घऱ खाली करावे या किरकोळ कारणासाठी देश पातळीवरील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्याच साठ वर्षीय जन्मदात्या आईचा खुन करुन तिच्या मृतदेहाचे तब्बल नऊ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा परीसरात उघडकीस आला आहे. त्याहुनही संतापजणक बाब आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावता यावी. यासाठी, मृतदेहाचे तब्बल नऊ तुकडे वेगवेगळ्या नऊ पिशवीत भरुन, मृतदेहाच्या पिशव्या मुळा-मुठा नदीत नऊ वेगवेगळ्या ठिकाणी फेकुन दिल्याचेही पुढे आले आहे. विशेष बाब म्हणजे आईच्या हत्येत व हत्येनंतर मृतदेहाच्या नऊ तुकड्यांची विल्हेवाट लावण्यात, संबधित पदाधिकाऱ्यांचा वीस वर्षीय मुलगाही सामिल असल्याचे पोलिस तपासात निस्पन्न झाले आहे.
आईने घऱ खाली करावे या किरकोळ कारणासाठी आईची हत्या करणाऱ्या देश पातळीवरील मोठ्या राजकीय पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्याला व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या वीस वर्षीय मुलाला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरील संतापजणक व आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार 5 ऑगष्ट रोजी घडला असुन, मृतदेहाचे तुकडे असलेल्या कांही पिशव्या मुळा-मुठा नदीतुन मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
पोलिस सुत्रांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पिडीत मयत महिला ही देहुरोड येथील शासकीय कार्यालयात माळीकाम करत होत्या. तर त्यांचे पती म्हणजे या प्रकरणातील आरोपीचे वडीलही वानवडी परीसरातील शासकीय कार्यालयात माळीकाम करत होते. या कामातुन मिळणाऱ्या पैशातुन पिडीत महिलेने आपल्या मुळाबाळासाठी मुंढवा परीसरात दिड गुंठे जागा खऱेदी करुन, त्या जागेवर घऱ बांधले होते. पिडीत महिलेला तीन मुली व दोन मुले असा परीवार होता. तिनही मुलीची ल्गन झालेली असुन, तिघींही आपआपल्या घरी राहतात.
दोनपैकी एक मुलगा शिरुरला राहत असुन, धाकटा मुलगा म्हणजेच या प्रकरणातील संशयित आरोपी मुंढवा येथे रहण्यास आहे. तो एका मोठ्या राजकय पक्षाचा पदाधिकारी असुन, त्याची दोन लग्ने झालेली आहेत. दरम्यान नवऱ्याच्या मृत्युनंतर पिडीत महिला एकटीच त्या घरात रहात होती. हे घर खाली करावे यासाठी मागिल कांही दिवसापासुन, पिडीतेचा मुलगा व त्याचे कटुंबिय आईला म्हणजेच वरील पिडीत महिलेला त्रास देत होते.
दरम्यान ऑगष्ट महिण्याच्या पहिल्या आठड्यात घऱ खाली करावे यासाठी मुलगा व त्याचे कुटुंबिय मारहान करत असल्याची तक्रार पिडीत महिलेने आपल्या तीनपैकी मधल्या मुलीकडे केली होती. या तक्रारीची खातरजमा करण्याच्या उद्देशने पिडीत महिलेची मुलगी पाच ऑगष्ट रोजी घरी आली असता, घरात आई नसल्याचे मुलीला आढळुन आले. याबाबत पिडीत महिलेच्या मुलीने आईबाबत भावाकडे व त्याच्या वीस वर्षीय मुलाकडे चौकशी केली असता, दोघांनीही दमदाटी करुन मुलीला व तिच्या नवऱ्याला हाकलुन दिले. मात्र घरातुन बाहेर पडतांना घऱात मोठ्या प्रमानात रक्त सांडल्याचे दिसुन आल्याने मुलीला काही तरी काळेबेरे घडल्याची शंका मनात आली.
दरम्यान मनात आलेल्या शंका निरसण करण्यासाठी पिडीत महिलेच्या मुलीने नातेवाईक व घराजवळच्या लोकांच्याकडे अधिक चौकशी केली वरी धक्कादायक प्रकरणाचे धागेदोरे मुलीच्या हाती लागले. यावरुन संबधित मुलीने मुंढवा पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात मुलाने आपल्याच साठ वर्षीय जन्मदात्या आईचा खुन करुन तिच्या मृतदेहाचे तब्बल नऊ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.
याबाबत मुढंवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने घऱ खाली करावे या किरकोळ कारणासाठी आईचा खुन करणारा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी व त्याच्या वीस वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आईच्या मृतदेहाच्या नऊ तुकड्यापैकी कांही तुकडे विविध ठिकाणाहुन पिशवीसह ताब्यात घेतले आहेत. तर उर्वरीत तुकडे शोधण्याचे काम युध्दपातळीवर चालु आहे. कांही नागरीकांना मदीपात्रात पिशवीत असलेले पिडीत महिलेच्या मृतदेहाचे तुकडे दिसुन आल्याची माहिती पोलिसांना दिल्यानेच, वरील तुकडे जमा करता आले आहेत. दोन्ही मांजरी गावांना जोडणाऱ्या नदी पात्रावरील पुलावरुन मृतदेहाच्या पिशव्या नदीत टाकल्याची कबुली या प्रकरणातील संशयित आरोपीं व त्याच्या मुलाने पोलिसांना दिली आहे.
नदीत अवयव दिसल्यास, तात्काळ पोलिसांना कळवा- मुंढवा पोलिसांचे आवाहन..
दरम्यान कोरेगाव मुळ व बिवरी जवळ नदीपात्रात खुन झालेल्या महिलेचा एक पाय कोरेगाव मुळ परीसरातील एका जागरुक शेकऱ्यामुळे पोलिसांना मिळाला आहे. मयत महिलेल्या नऊ भागापैकी उर्वरीत भागही मांजरी बुद्रुक, कोरेगाव मुळ, कोलवडी, साष्ठे, थेऊर, अष्टापुर हद्दीतील नदीपात्रात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस यंत्रना शोध घेत असली तरी,नागरीकांनीही आपआपल्या भागात महिलेचे अवयव अथवा अवयव असलेली संशयित पिशवी पाण्यात दिसुन आल्यास, तात्काळ कळवण्याची विनंतीही मुंढवा पोलिसांनी केली आहे.