शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत : शिरूर तालुक्यातील फाकटे, वडनेर खुर्द, चांडोह येथे झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे फाकटे येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा पहिला दिवस असून, अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक या उपोषणास पाठिंबा देत आहेत. या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते नितीन पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य पवन वाळुंज, माजी उपसरपंच मनीष बोऱ्हाडे यांनी पाठिंबा दिला.
अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा उपोषणास पाठिंबा
शिरूर बेट भागातील फाकटे, वडनेर खुर्द, चांडोह हे रस्ते दोन गावांना जोडणारे आहे. या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. या रस्त्याने वाडी वस्तीवरील शाळकरी मुले व शेतातील शेतमाल तसेच ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु, आज या रस्त्याची दुरावस्था झालेली दिसून येते. (Shirur News) या रस्त्याने वाहने चालवणे तर दूरच पायी चालणेही कसरतीचे झाले आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाचे खड्ड्यामुळे अपघात होत आहेत. याचे प्रमाणही वाढले आहे. या गावांमध्ये कोणी रस्ता देतं का रस्ता? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
फाकटे ते वडनेर खुर्द रस्त्यासाठी अनेकदा निधीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, गेल्या 40 वर्षांपासून कोणताही आमदार, खासदार, पदाधिकारी याकडे लक्ष देत नाही. (Shirur News) संबंधित भागाच्या लोकप्रतिनिधींना वारंवार भेटून निधीची मागणी करून अद्याप कोणी याकडे लक्ष देत नाही.
अतिशय महत्वाचा हा रस्ता असून, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. तसेच पावसाळ्यात पायी चालत जाण्यासाठी देखील त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्याचे काम होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shirur News) अनेकवेळा पाठपुरावा करुनही कुठल्याच प्रकारे अद्यापपर्यंत काम किंवा दुरुस्ती झालेली नाही. आता ग्रामस्थाची मागणी व आक्रोश वाढलेला दिसत आहे. या कामाबाबत संबंधित कार्यालयाने व पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.
५ मार्च रोजी तहसील कार्यालय शिरूर, शिरूर पोलीस स्टेशन, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती शिरूर, जिल्हा परिषद कार्यालय पुणे यांना लेखी स्वरुपात निवेदन दिले होते. (Shirur News) परंतु, आजपर्यंत कोणीही कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्याने या गोष्टीची अंमलबजावणी न झाल्यामुळे या संदर्भातील स्मरणपत्रही २० सप्टेंबरला सर्व कार्यालयांना देऊन उपोषण सुरू केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर उर्फ नितीन पिंगळे, माजी उपसरपंच मनीष बोऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य पवन वाळुंज, निचीत बाबा प्रहार अपंग क्रांती संघटना, अंकुश भुजबळ, शांताराम पानमंद, लंकेश शिंदे, प्रदीप शिंदे, काशिनाथ थोरात, लहू गावडे, पवन शिंदे, सुनील राऊत, शंकर गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
शाळकरी मुलांना ये-जा करण्यासाठी हा रस्ता धोकादायक झाला आहे. दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
तसेच ही तिन्ही गावे बिबट प्रवण गावे असल्यामुळे वाघाची दडण या भागात जास्त झाली आहे. वाघांच्या भितीमुळे शेतकऱ्यांना व मजूर महिलांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. जर या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. तर उपोषण सुरू राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.– नितीन पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : फ्रेंडशिप गणेश मित्र मंडळ आयेजित शिबिरात ७० जणांचे रक्तदान
Shirur News : बंदूकधारी पोलीस, रुग्णवाहिका अन् जमावाला थोपविण्याची धडपड…