उरुळी कांचन : सर्वांचाच लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांचे मोठ्या दिमाखात बुधवारी (ता. ३१) आगमन झाले आहे. बुधवार सकाळपासून सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. घरातील गणपतीची आरास तसेच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देणारे मेसेज मित्र – मैत्रिणींना शेअर केले जात आहेत.
मित्रपरिवार, नातेवाईक यांना भेटणे शक्य नसल्याने व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच नेटकऱ्यांनी श्री गणेशाचे फोटो एकमेकांना फॉरवर्ड केले जात आहेत. वेगवेगळे व्हिडिओ, स्टिकर्स, आरती संग्रह यामुळे सोशल मीडिया बाप्पामय झाला असल्याचे चित्र सध्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसून येत आहे.
गणेशोत्सवाला शुक्रवारपासून सर्वत्र प्रारंभ झाला. यंदा या उत्सवात कुठेही जल्लोष अथवा ढोल ताशांचा निनाद दिसला नाही. कोरोनामुळे या वर्षीही गणेशोत्सवावर परिणाम झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. नेटकऱ्यांनी कित्येक दिवस अगोदरपासून बाप्पांचे मॅसेज व फोटो फॉरवर्ड करीत आहेत. वेगवेगळे व्हिडीओज, आरती संग्रह याद्वारे सोशल मीडिया बाप्पामय झाला आहे.
दरम्यान, गणेश भक्तीचा उत्साह मोबाईलमधून ओसांडून वाहत आहे. पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना दिसून येत आहे.