Job News : मुंबई : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये अर्थात एमपीएससीमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत शासकीय कला महाविद्यालयात विविध पदांवर भरती केली जाणार आहे.
कोणत्या पदांवर भरती होणार?
सहाय्यक प्राध्यापक म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर या पदावर भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा काय?
उमेदवार 18 ते 38 या वयोगटातील असणे गरजेचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत काही सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक यासाठी अर्ज करू शकतात. यासोबत पीएचडी आणि दोन वर्षांच्या कामाचा अनुभव असावा.
अर्ज शुल्क किती?
जर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर पदासाठी सामान्य उमेदवार म्हणून अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 394 रुपये भरावे लागतील. याशिवाय इतर प्रवर्गातील सर्व उमेदवारांना 294 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे.
किती मिळेल पगार?
जर तुमची या पदासाठी निवड झाली तर तुम्हाला 57,700 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
अर्ज करण्याची शेवटची तारीख?
तुम्ही या पदासाठी 3 ऑक्टोबर 2023 पूर्वी अर्ज करू शकता.
कुठं करावा अर्ज?
अर्ज करण्यासाठी mpsc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन करता येऊ शकणार आहे.