पुणे : दहावी आणि बारावीचा फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर शुक्रवारी (ता.२) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. आणि हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत हि परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती. तर बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते २४ ऑगस्ट या कालाधीत घेण्यात आली होती.
दरम्यान, या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. गुण पडताळणीसाठी ३ ते १२ सप्टेंबर, तर छायांकित प्रतीसाठी ३ ते २२ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.