जीवन सोनवणे
भोर, (पुणे) : भोर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरून शून्य शिक्षक असलेल्या शाळा सुरु केल्या नाहीत. तर अशा शाळांना आणि पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला कुलूप लावणार असा इशारा माजी सभापती लहू शेलार यांनी दिला. असे पत्र जिल्हा परिषदेला पाठविले असून त्याची प्रत त्यांनी गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांना दिली आहे.
भोर तालुका डोंगराळ भागात येत असल्यामुळे शिक्षक येण्यास तयार नसतात. आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागांची संख्या कमी आहे. शिक्षक नसलेल्या शाळांमध्ये शेजारच्या शाळेतील शिक्षक पाठवून शाळा कशाबश्या सुरु ठेवल्या आहेत.
आमच्या शाळेवर शिक्षकांची नेमणूक करा नाहीतर आम्ही शाळा बंद करू अशी भूमीका शून्य शिक्षक असलेल्या शाळांच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. याशिवाय तालुक्यातील गटशिक्षणाधिका-यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. परंतु भोरचा पदभारही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात भोर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरून शून्य शिक्षक असलेल्या शाळा सुरु केल्या नाहीत. तर अशा शाळांना आणि पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला कुलूप लावणार असा इशारा माजी सभापती लहू शेलार यांनी दिला असून पत्र जिल्हा परिषदेला पाठविले आहे व त्याची प्रत गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांना दिली आहे.
भोर तालुक्यातील २७४ प्राथमिक शाळांमधील ९ हजार ७११ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.