Pune News : पुणे : व्याजाच्या पैशांसाठी बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांनी तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राहुल बबन वताडे (वय २८, रा. मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) वताडे यांच्या फिर्यादीवरून अजय सिंग दुधानी (वय ३२), निहालसिंग टाक (वय ३०) आणि बच्चनसिंग भोंड (वय ३०, सर्व रा. रामटेकडी हडपसर) या सावकारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवताडे यांनी दुधानी, टाक, भोंड यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाच्या पैशांसाठी आरोपींनी वताडे यांना धमकावून दुचाकी ताब्यात घेतली होती. (Pune News) त्यानंतर तिघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या अवताडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल दिली.
त्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : येरवड्यात बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल व खिशातील रोकड लंपास; दोघांना अटक
Pune News : हडपसर परिसरात परदेशी नागरिकांकडून अंमली पदार्थांची विक्री; दोघांना अटक