शुभम वाकचौरे
जांबूत, (पुणे) : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांदळी कुतळमळा परिसरात पाण्याची साडेतीन फूट लांबीची बोअरवेलची इलेक्ट्रिक मोटर व मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना नारायणपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक बोअरवेलची इलेक्ट्रिक मोटर व एक हिरो होंडा पॅशन कंपनीची मोटरसायकल हस्तगत केली आहे.
मोहन अनिल माळी वय- १८) व विशाल अंकुश माळी (वय-२० रा. दोघेही श्रीरामपूर, अहदनगर असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशन हददीत रात्रीच्यावेळी बोअरवेल मधील इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नारायणगाव पोलीस तपास करीत असताना, नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दिमधील बोअरवेलची इलेक्ट्रीक मोटार चोरीमधील संशयित इसम कांदळी कुतळमळा येथील निजाम कासम पठाण यांचे पोल्ट्री फार्म परिसरामध्ये फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.
सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार मोहरे, भुसावरे, मंगेश लोखंडे, पोलीस कॉनस्टेबल दत्ता ढेंबरे, शैलेश वाघमारे, गोरक्ष हासे यांच्या पथकाने वरील दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, त्यांचायाकडे चौकशी केली असता दोघांनी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कांदळी कुतळमळा परिसरातून पाण्याची बोअरवेलची मोटार व एक हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींना अटक केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोहरे हे करत आहेत.