Health News : पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. निरोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या पालेभाज्यांचा आपण आहारात समावेश केला पाहिजे; हे तर आपण जाणतोच. पालेभाज्या म्हटलं की आपल्या डोक्यात सगळ्यात पाहिलं येत मेथी अन् पालक मात्र मेथी आणि पालक त्याहून वेगळे गुणधर्म असणाऱ्या आणि वजन कमी करायला मदत करणाऱ्या लाल माठ भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
लाल माठ भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के तसेच फोलेट, रिबोफ्लेविन आणि कॅल्शियम, फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात. लाल माठ भाजीचा आहारात समावेश केल्याने आपल्या शरीरातील सर्व अशुद्धी, विषारी घटक मलनिस्सारणातून बाहेर पडतात. लाल माठ भाजीचा आहारात समावेश केल्याने बद्धकोष्ठता, अपचन असे आजार नाहीसे व्हायला मदत मिळते. लाल माठ भाजीचा आहारात समावेश केल्याने किडनीचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
गर्भवती स्त्रियांसाठी उपयुक्त..
लाल माठ भाजीमध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असल्याने लाल माठ भाजीचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढवण्यास मदत मिळते. लाल माठ भाजीमध्ये लोह मुबलक प्रमाणात असत त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी लाल माठ भाजीचा आपल्या आहारात समावेश नक्की केला पाहिजे; याशिवाय हिमग्लोबीन कमी असणाऱ्यांनी देखील लाल माठ भाजी खाल्ली पाहिजे.