राहुलकुमार अवचट
Daund News : यवत : दौंड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक नुकतीच दौंड येथे आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. क्रीडा संकुलाच्या जागेचे समतलीकरण करणे, ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस व बास्केटबॉल आदी खेळांसाठी आवश्यक मैदाने व सुविधा तयार करण्याचे नियोजन असून, त्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली.
आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा संकुल समितीची बैठक
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दौंड क्रीडा संकुल व नाट्यगृहासाठी कृषी विभागाकडील बीजगुणन केंद्राची १० एकर जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करून घेण्यात यश आले होते. जागेचा प्रश्न सोडवून, या संकुलासाठी सुमारे ९.५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळली होती. यापैकी सुमारे १ कोटी ५० लक्ष रुपये निधी संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. (Daund News) याठिकाणी सध्या संरक्षण भिंतीचे बांधकाम चालू असून, पुढील टप्प्यामध्ये क्रीडा संकुलाच्या जागेचे समतलीकरण करणे, ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस व बास्केटबॉल आदी खेळांसाठी आवश्यक मैदाने व सुविधा तयार करण्याचे नियोजन असून, त्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे.
अंदाजपत्रक तयार करून लवकरच कामाला सुरुवात करता यावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, मैदानाचा आराखडा करताना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा, (Daund News) खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना या वेळी आमदार राहुल कुल यांनी दिल्या.
या बैठकीस तहसीलदार तथा समितीचे कार्याध्यक्ष अरुण शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहय्यक अभियंता मयूर सोनवणे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, महावितरणचे उपभियंता चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : ‘आयुष्मान भव’ कार्यक्रमाअंतर्गत विविध आरोग्यविषयक सेवासुविधेची जनजागृती
Daund News : देलवडी गावच्या माजी उपसरपंच सुलोचना विष्णुपंत शेलार यांचे अल्पशा आजाराने निधन
Daund News : दिशा प्रतिष्ठानचा ‘कृतिशील क्रीडा मंडळ’ पुरस्काराने गौरव