उरुळी कांचन, (पुणे): शाळेचे शिक्षण झाल्यानंतर २९ वर्ष पूर्ण झाल्यानंतर इतक्या वर्षांत प्रत्येकजण आपापल्या संसार, उद्योग, व्यापार, नोकरीत गुंतलेला असतो. प्रत्येकाचे ठिकाणही वेगळे, मात्र एकत्र येण्याची इच्छा असेल तर एवढ्या वर्षांनीही जुने मित्र मैत्रिणी भेटू शकतात, हे साध्य केले आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या १९९२-९३ च्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम डॉ. शरद गोते, कालिदास तुपे,सदानंद बालगुडे, संतोष शितोळे, विकास म्हेत्रे, अजय सोनवणे, सुवर्णा कुंजीर-कांचन, हेमलता तुपे-पवार, संगिता काळभोर-कांचन यांनी केले होते.
या सर्वांचे स्नेहसंमेलन उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात रविवारी (ता. २८) मोठ्या उत्साहात झाले. त्यामुळे जुन्या आठवणींनी प्रत्येकजन गहिवरून गेले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे माजी शिक्षक व सध्या नागपूर चे अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले लठाड सर तसेच वनवे सर (शिक्षणाधिकारी) प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात माजी प्राचार्य अरविंद खिरे सर, किसन नेवसे सर, बबनराव दिवेकर सर, देविदास टिळेकर सर, बाळकृष्ण काकडे सर, मासीम सय्यद सर, तुकाराम कांचन, लता बडगुजर मॅडम, विद्यमान प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य किशोर कोकाटे उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल-श्रीफळ ,व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला १७५ विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमेकांशी सुसंवाद साधून आठवणींना उजाळा दिला. आपापल्या वर्गात जाऊन वर्गशिक्षकांबरोबर संवाद साधला, यावेळी दिपक थोरात, भाऊसाहेब महाडिक, गणेश पवार, संजय पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. या स्नेहमेळाव्यासाठी कालिदास तुपे, अजय सोनवणे, नाना चौधरी, नितीन गोते, सूर्यकांत काकडे, चंद्रशेखर शितोळे, विजय तांबे, शेखर अलिपुर, सतीश टिळेकर, महादेव रेवडकर, गोविंद शिंदे, सुनील निकाळजे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमा नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत डॉ. शरद गोते यांनी सूत्रसंचालन विकास म्हेत्रे यांनी तर आभार सदानंद बालगुडे यांनी मानले.