पुणे : पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक व प्रिया संदीप कर्णिक यांच्या हस्ते काल विधिवत संपन्न झाली. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी अभिनेत्री मानसी नाईक उपस्थित होती
वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरूजी यांनी यांनी पौराहित्य केले. पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना हॉटेल सारस येथील हॉलमध्ये करण्यात आली आहे. तेथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशातील 350 हून अधिक चित्रकार महिलांच्या ‘आकृती’ ग्रुप तर्फे यंदा 34 व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व कलादालन येथे पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन 1 ते 3 सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आले आहे.
उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, यांसबरोबर रमेश बागवे, ऍड. अभय छाजेड, काका धर्मावत, मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरा आणि वडील डॉ. राजन नाईक उपस्थित होते. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे विविध समितीयांचे समन्वयक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रिब्यूट टू लेजेंड्स याचे उद्घाटन आज 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11ः30 वाजता बालगंधर्व कलादालन येथे होईल. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राज्य कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, लातूरचे डॉ. राम बोरगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ‘बोलत्या रेषा’ म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध चित्रकार घनशाम देशमुख विशेष निमंत्रित असतील. या स्पर्धेचा विषय ‘ट्रिब्यूट टू लेजेंड्स’ असा आहे.