लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून ‘हिंदी दिन’ गुरुवारी (ता. १४) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “संस्कारो से सजी धजी है! सिर पर न्यारी बिंदी है! इससे सुंदर नही है भाषा! सबसे प्यारी हिंदी है! अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, भाषणे व कविता सादर केल्या.
हिंदी दिनाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेमधून नाटिका, गाणी, कविता, पहेलिया, चुटकुले, कबीराचे दोहे सादर केले. विद्यालयाचा परिसर दिवसभर हिंदी भाषामय झाला होता. या वेळी काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज, राजभाषा या विषयावर मनोगत व्यक्त केले. तसेच हिंदीमधून लिहिलेले लेख, गीत, देशभक्तीपर चित्रे यांचा हिंदी भाषा कोपरा तयार केला.
दरम्यान, इयता सहावीच्या विदयार्थ्यांनी “सोशल मिडिया के साईड इफेक्ट” ही नाटिका सादर करून सोशल मिडियाचे उपयोग आणि दुरुपयोग समजावून सांगितले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी, पर्यवेक्षिका रेखा पाटील, विलास शिंदे, शर्मिला साळुंखे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुबाला काळभोर यांनी केले. तर आभार कल्पना बोरकर यांनी मानले.
दरम्यान, इयता सहावीच्या विदयार्थ्यांनी “सोशल मिडिया के साईड इफेक्ट” ही नाटिका सादर करून सोशल मिडियाचे उपयोग आणि दुरुपयोग समजावून सांगितले. या वेळी शाळेच्या प्राचार्या पोर्णिमा शेवाळे, इनचार्ज सुलताना ईनामदार, मेघा शिंदे, गेयती काळभोर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका पूजा ठवाळ व विद्यार्थिनी अनुजा साळुंखे यांनी केले. तर आभार शिक्षिका रेश्मा काळभोर व विद्यार्थिनी तनिष्का लोखंडे यांनी मानले.