Job News : नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण 800 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली जात आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट westerncoal.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
‘वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड’ने ट्रेड अप्रेंटिसची रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेंतर्गत तब्बल 875 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी 815 रिक्त पदे ITI उत्तीर्ण ट्रेड अप्रेंटिस आणि 60 रिक्त जागा फ्रेशर ट्रेड अप्रेंटिससाठी असणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवार वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
एकूण पदांची संख्या 875 असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
जाणून घ्या कसा करावा अर्ज…
– सर्वप्रथम www.westerncoal.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा. यानंतर Apprentice टॅबवर क्लिक करा.
– स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. त्यानंतर संबंधित लिंकवरून अर्ज भरावा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर अर्ज सबमिट करावा. तसेच प्रिंटही घ्यावी.