पुणे : सांगवी येथील नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या १६ वा वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते व पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे आधारस्तंभ रामचंद्र ऊर्फ तात्यासाहेब दामोदर कड यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पिंपरी चिंचवड कलाकार संघाचा 16 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम सत्रात दिप्ती कांबळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आढाळगे, ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते वसंत अवसरीकर, पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजय उलपे, कार्याध्यक्ष चित्रसेन भवार व सर्व मान्यवर पदाधिकारी, कलाकार यांच्या उपस्थितीत रंगमंच पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
सचिन काटे व राजू आणि सहकाऱ्यांनी पारंपरिक गण, गोंधळ सादर केला. जादूगार रघुराज तथा विनायक कडवळे यांनी जादूचे प्रयोग सादर केले. दुपारच्या सत्रात लोकधारामध्ये आरती पुणेकर, अस्मिता नारायणगावकर, समृद्धी पुणेकर, मंजूश्री वाघमारे यांनी लावणी नृत्य सादर केले. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. फडमालक रघुवीर खेडकर यांनी ‘ग साजणे…’ हे गाणे स्वतः डान्स करून सादर केले. त्यांच्यासोबत हेमा कोरबरी यांनीही नृत्य केले. त्यानंतर बेल्हे येथील श्री साई दत्त नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप यांनी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचे अतिशय गाजलेले गीत सादर केले.
सायंकाळी मुख्य पुरस्कार सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, गायक आनंद शिंदे, लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर, माजी नगरसेवक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राहूल शिंदे, अनिल गुंजाळ व अध्यक्ष विजयकुमार उलपे यांच्या उपस्थितीत रामचंद्र ऊर्फ तात्यासाहेब दामोदर कड यांना जीवनगौरव, समाजभूषण पुरस्कार माजी नगरसेवक शशिकांत कदम, समारत्न पूरस्कार संदिप गायकवाड, समाजरत्न पूरस्कार भाजपचे नेते रामशेठ गावडे, तमाशा कलागौरव पूरस्कार दिलीप सोनार धुळेकर, दिवंगत कवी हरिनंद रोकडे स्मृती पुरस्कार प्रसिद्ध गायिका साधना मेश्राम, आरोग्यमित्र पुरस्कार गणेश खंडागळे, कलामित्र पुरस्कार मिठू महादेव पवार, उत्कृष्ट गीतकार पुरस्कार हरिदास कड, कलागौरव पूरस्कार शिवशाहीर बाळासाहेब काळजे, प्रसिद्ध निवेदक गायक संगीतकार चित्रसेन भवार यांना देण्यात आला.
तसेच दत्तात्रय शिंदे, आशा तेलंग, अर्चना सावंत, दिगंबर गरूड, रुपाली पाथरे, आरती पुणेकर, दिलीप घोडे, प्रकाश सुतार, विनायक कडवळे (रघूराज), सुनिल पाटील, राजेंद्र ताम्हाणे, डॉ. श्रीधर मोरे, सुनिल धेंडे यांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन कार्याध्यक्ष चित्रसेन भवार, सचिव संजय मगर, राजेश डेव्हिड, राजेश जाधव, अमिर शेख, मिठू पवार, के. डी. कड, बाळासाहेब निकाळजे, गणेश गायकवाड, हेमा कोरबरी, शिल्पा भवार, आरती चतुर्वेदी, संचिता गोसावी, दिलीप घोडे, देविदास साठे, दादा साळवे, दिगंबर गरूड, अमोल पांढरे, महेंद्र अडसूळ, सॅमसन चंदनशिव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजितराजे पुजारी यांनी केले तर जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष चित्रसेन भवार यांनी केले.