Health News : दैनंदिन जीवन जगत असताना काही शारीरिक वेदना, समस्या असतातच. त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न असतो. पण त्यादेखील आल्याशिवाय राहत नाहीत. त्यात मूळव्याध ही समस्या अनेकांना सतावत असते. त्याला आपण पाईल्सही म्हणतो. मूळव्याध ही एक गंभीर समस्या आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली यामुळे अनेकांना हा आजार होतो.
मूळव्याधापासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकेल, असे सांगितले जाते. त्यामध्ये पाणी पिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हा मूळव्याध आणि बद्धकोष्ठता दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. मूळव्याधासाठी पाणी हा सर्वोत्तम आणि स्वस्त उपाय मानला जातो. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो.
कोरफडही फायदेशीर
कोरफड हा मूळव्याध उपचारांसाठी एक नैसर्गिक उपाय आहे. कोरफडचा उपयोग मूळव्याधापासून आराम मिळण्यासाठी केला जातो. कोरफड हा मूळव्याधासाठी तात्पुरता घरगुती उपाय असला तरी तो सहज उपलब्ध आहे आणि मूळव्याधची लक्षणे लवकर बरी होण्यास मदत करतो.
खोबरेल तेल गुणकारी..
मूळव्याध बरा करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर दोन प्रकारे करू शकता. खोबरेल तेलाचे सेवन करून किंवा ते लावूनही घेता येते. मूळव्याधच्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी या दोन्ही पद्धती प्रभावी आहेत.