चाकण (पुणे) : भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा (उत्तर) चे अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत पक्षाचे सरचिटणीस म्हणून डॉ. ताराचंद कराळे (आंबेगाव), संजय रौधळ (खेड), भगवान शेळके (शिरुर) व सविता शिवाजी गावडे (मावळ) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर पक्षाच्या पुणे जिल्हा (उत्तर) सोशल मीडिया संयोजकपदी ‘पुणे प्राईम न्यूज’चे मुख्य संपादक जनार्दन गोवर्धन दांडगे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुदर्शन चौधरी (हवेली), प्रविण काळभोर (हवेली), महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी पुनम सागर चौधरी यांची निवड जाहीर झाली. तसेच शरद बुट्टे-पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या हवेली तालुकाध्यक्षपदी शामराव गावडे यांची तर भारतीय जनता पक्षाच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आल्याचीही घोषणा यावेळी केली.
पुणे-नाशिक रोडवर भाम (ता. खेड) येथील राजरत्न हॉटेलसमोर शरद बुट्टे-पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात पक्षाच्या नूतन जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद बुट्टे-पाटील यांनी यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक बाळा भेगडे, भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा (उत्तर) कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
सरचिटणीस – डॉ. ताराचंद देवराम कराळे (कारेगाव ता. आंबेगाव), संजय सोपान रौंधळ (रौंधळवाडी कोहिंडे बु. ता.खेड), भगवान किशनराव शेळके (पिंपळे जगताप ता.शिरूर), सविता शिवाजी गावडे (सुन्दुंबरे ता.मावळ).
उपाध्यक्ष – राजेश कैलास काळे (घोडेगाव ता. आंबेगाव), रामदास विठ्ठल गाडे (सुन्दुंबरे ता.मावळ), प्रवीण उत्तमराव काळभोर (लोणी काळभोर, ता.हवेली), सुदर्शन जयप्रकाश चौधरी (सोरतापवाडी ता. ता.हवेली), गणेश नारायण सांडभोर (ता. खेड जि.पुणे), भगवान नाथा घोलप (रोह्कडी ता.जुन्नर) व ज्योती सुरेश जाधव (तळेगाव दाभाडे ता.मावळ)
चिटणीस – आशिष गजानन माळवदकर (नारायण गाव ता. जुन्नर), प्रमोद हरिभाऊ बाणखेले (मंचर ता.आंबेगाव) प्रदीप शिवाजी सातव (वाघोली ता.हवेली), पंडित रामदास मेमाणे (खिरेश्वर खुबी ता.जुन्नर), विजया दिलीप भांडवलकर (तळेगाव दाभाडे ता.मावळ), रोहिणी/ वर्षा फक्कड राव काळे (ताडोबाची वाडी ता.शिरूर)
जिल्हा कार्यकारणी सदस्य –
वैजयंती वासुदेव चव्हाण (सरदवाडी ता. शिरूर), प्रमिला शरद निऱ्हाळी (मंचर ता. आंबेगाव), स्वप्ना महेंद्र पिंगळे (मंचर ता. आंबेगाव), सविता विजय गायकवाड (खोडद ता.जुन्नर), संगीता अजित वाघ (पिंपळवंडी ता. जुन्नर), सुवर्णा संतोष कुंभार (कामशेत ता. मावळ), ज्ञानेश्वर सोनबा साकोरे (केंदुर ता. शिरूर), जयसिंग मारुती एरंडे (कोल्हारवाडी ता. आंबेगाव), गुलाबराव जयसिंगराव हिंगेपाटील (अवसरी बु, ता.आंबेगाव), डॉ. राजेद्र पंढरीनाथ ढमढेरे (तळेगाव ढमढेरे ता. शिरूर), कालिदास भागवत वाडेकर (चाकण ता. खेड), अशोक धर्माजी माशेरे (अहमदाबाद ता.शिरूर), आण्णाराजे भैरुशेठ शिवले (तुळापुर ता. हवेली), ज्ञानेश्वर गनभाऊ बहिरट (गुनाट ता. शिरूर), पाडुरंग गुलाबराव ठाकूर (सोळु. ता.खेड), अशोक विठ्ठल गाजरे (निमोणे ता, शिरूर), अनिल नानाभाऊ नवले (कासारी, ता. शिरूर), बाळासाहेब नंदू लंघे (संविधाने ता. शिरूर), भानुदास बबनराव काळे (घोडे ता.आंबेगाव), संजय सुभाषराव घुंडरे (आळंदी ता.खेड) जयेश प्रकाश शिंदे (विठ्ठलवाडी ता. शिरूर).
तसेच विजय बबन पवार (नारोडी, ता.आंबेगाव), सुर्यकांत शिवराम मुंगसे (रासे, ता.खेड), हरिदास सुदामराव गोकुळे (चिंचोशी, ता.खेड), दत्तात्रय रंगनाथ सांडभोर (राजगुरुनगर, ता. खेड), साहेबराव सखाराम तांबोळी (उदापूर, ता. जुन्नर), अमृत मारुतराव शेवकरी (चाकण, ता. खेड), काशिनाथ शिवराम आवटे (राजुरी, ता. जुन्नर), सुनील विनोदचंद्र शहा (जुन्नर), उल्हास नामदेव नवले (येणेरे, ता.जुन्नर), संपत कोंडीबा साकोरे (केंदूर, ता. शिरूर), मारुती ज्ञानेश्वर शेळके (पाबळ, ता. शिरूर), एकनाथ भागचंद महासळकर (जातेगाव खुर्द, ता.शिरूर), किसन बापू गोरडे (वाघाळे ता. शिरुर), साविता विजय थोरात (टाकळी हाजी ता.शिरूर).
भाजपा आघाडी पदाधिकारी –
सहकार आघाडी- चंद्रशेखर बाळासाहेब शेट (वाडा.ता.खेड), आयटी सेल आघाडी – नितीन प्रकाश थोरात (टाकळी भीमा ता.शिरूर), पंचायात राज व ग्रामविकास आघाडी – रविंद्र बाळासाहेब दोरगे (टाकळीभिमा ता. शिरुर), क्रीडा आघाडी – रवींद्र मानसिंगराव ढमढेरे (तळेगाव ढमढेरे ता.शिरूर), ‘मन की बात’ आघाडी – बापूसाहेब बबनराव काळे (निमगाव म्हाळुंगे ता.शिरूर), उद्योग आघाडी – रविंद्र कोंडीबा गायकवाड (केंदुर ता. शिरूर), उत्तर भारतीय आघाडी – अंशु प्रेमकुमार पाठक (तळेगाव दाभाडे ता. मावळ), दक्षिण भारतीय आघाडी – धीरज रमेश नायडू (देहू रोड पुणे), मेडिकल असोसिएशन्स – धनंजय श्रीपती गारगोटे (वाकी बु. ता.खेड), युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सोमनाथ सातव (वाघोली ता .हवेली), किसान मोर्चा – सचिन भरत मचाले (बाभुळसर, ता. शिरूर), ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष – दत्तात्रय ज्ञानोबा माळी (चांद खेड ता. मावळ ), अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष – अशोक भगवान गभाले (गोहे, बु.ता.आंबेगाव), अल्पसांख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष – राजू सय्यद शेख (शिरूर).