लोणी काळभोर (पुणे) : वॉरंट रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार मुकुंद रणमोडे व त्याच्या एका सहकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १५ मिनिटांपूर्वी एक जणाकडून वॉरंट रद्द करण्यासाठी मुकुंद रणमोडे व एक होमगार्ड पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
मुकुंद रणमोडे यांच्याबाबत मागील सहा महिन्यांपासून विविध तक्रारी मिळत होत्या. मात्र वरीष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अखेर एका तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरील कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त थोड्या वेळातच.