पुणे : चालणे हा उत्तम व्यायाम मानला जातो. त्यामुळे दिवसातून दहा ते पंधरा मिनिटं चालणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलेच फायद्याचं ठरू शकतं. दररोज नियमित चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. हे संशोधनातून सिद्धही झाले आहे. त्यामुळे नियमित चालणे सुरु करणे आता एक काळाजी गरज बनली आहे.
जर एखादी व्यक्ती दिवसांतून 11 मिनिटे चालली तर 10 पैकी एका व्यक्तीचा अकाली मृत्यू टाळता येईल. पण आठवड्यातून फक्त 150 मिनिटे व्यायाम करणेही बहुतेक लोकांना शक्य होत नसल्याचे दिसून आले आहे.
प्रमाणात व्यायाम केल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका 17 टक्क्यांनी तर कॅन्सरचा धोका 7 टक्क्यांनी कमी होत असल्याचं अभ्यासात सांगण्यात आले आहे. याशिवाय, नियमित व्यायामामुळे शरीरातील चरबी आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. आरोग्य, झोप आणि हृदयाचं स्वास्थ्य सुधारू शकते.
आठवडाभरात 75 मिनिटांचा व्यायाम किंवा दररोज 11 मिनिटे सायकल चालवणं, वेगाने चालणं, डोंगर चढणं, नृत्य करणं किंवा टेनिस खेळणं फायद्याचं ठरू शकतं. प्रत्येक व्यक्तीने दर आठवड्याला किमान 150 ते 300 मिनिटांचा व्यायाम शारीरिक केला पाहिजे. यातून व्यक्तीच्या हृदयाची हालचाल वाढते. तसेच दर आठवड्याला किमान 75 ते 150 मिनिटांचा जोरदार व्यायाम केल्यास ते देखील आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.