पुणे : शालेय विद्यार्थिनींवर होणारे अत्याच्यार रोखण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची दर पाच वर्षांनी चारित्र्य पडताळणी होणार आहे. असे आदेशही प्रशासनाकडून शाळांना देण्यात आले आहेत.
भिगवण (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका विद्यार्थीनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्याने एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीने केलेल्या तपासणीत शिक्षण दोषी आढळून आला होता. त्यानंतर नराधम शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेची जिल्हा परिषद प्रसशानाच्या वतीने गंभीर दखल घेऊन वरील आदेश दिले आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लेखी आवाहन करून शाळांना सूचना दिल्या आहेत.
शाळांना दिलेले आदेश
१) शाळेने पीडितेची बाजू घेत तिला मदत करावी.
२) हि माहिती त्वरित वरिष्ठ कार्यालयांना द्यावी.
३) विद्यार्थ्यांना गोपनीयरीत्या तक्रार नोंदविण्याची तजवीज करावी.
४)सिक्युरीटी बेल बसवाव्यात.
५)विद्यार्थ्यांचे हात पोहोचतील अशा उंचीवर या बेल बसवल्या जाव्यात).
६) तक्रारीवर त्वरीत कार्यवाही करावी.
७) चाईल हेल्पलाईन नंबर १०८९, पोलिसांचा नंबर १००, महिला सुरक्षा नंबर १०९० आणि इमर्जन्सी नंबर ११२ असे फलक लावावे.
८)शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.
९)विद्यार्थ्यांनाही गुड टच-बॅड टच याबाबत प्रबोधन करावे.
१०)पालकांच्या लेखी परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीला भेटू देऊ नये.
११) त्याबाबत सुरक्षारक्षकांनाही माहिती दिली जावी.