Pune News : पुणे : देशात काही महिन्यांत लोकसभा निवडणुका होणार असून, भाजपसह इतर पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अचानकपणे सुरु झाली आहे. चर्चेनंतर पुणे भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्याचे कोणतेही संकेत नसताना थेट २०२४ च्या पुणे लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते संजय काकडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.
मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची चर्चा
दरम्यान, आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदी हे भाजपाचे पुण्यातील उमेदवार असतील, यामुळे फक्त पुण्यात नाही तर राज्यात काय फरक पडेल, वगैरे चर्चांना धुमारे फुटले आहेत. (Pune News) त्यातच माजी खासदार संजय काकडे यांनी थेट मोदी यांना पत्र लिहीत लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवण्याची मागणी केली आहे. ते पत्रात मोदींना विनंती करत म्हणतात, जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली तेव्हा त्या राज्यात ९० ते १०० टक्के भाजपाला यश मिळाले. पुण्यात तुमचा विजय १०० टक्के असून, राज्यातही ९० ते १०० टक्के भाजपच असेल.
संजय काकडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर आम्ही रक्ताचे पाणी करुन त्यांना निवडून आणू… दरम्यान, सप्टेंबर महिन्यात मोदी सरकारने लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. (Pune News) एक देश एक निवडणुकीची चर्चा यामुळे सुरू झाली असून, मुदत संपण्याआधी लोकसभा निवडणुका होतील अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आत्ताच संभाव्य लोकसभा उमेदवारांबद्दल चर्चा जोर धरू लागली आहे.
भाजपाचे नेते सुनील देवधर हे पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा काल सोशल मीडियावर रंगली होती. या चर्चेला काही तास होत नाही तोच पंतप्रधान मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अचानक सुरू झाली आहे. (Pune News) तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यावर काकडे म्हणाले, धंगेकरांनी उभं राहावं त्यांना आमचा विरोध असण्याचे कारण नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांचा वेश्याव्यवसाय; १९ जणांवर कारवाई