Pune News : पुणे : कोणत्याही जैविक, रासायनिक आणि आण्विक हल्ल्याला तोंड देण्याची क्षमता असणाऱ्या एका आगळ्या-वेगळ्या गाडीची निर्मिती भारत सरकारच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आली आहे. ‘एनडीआरएफ’साठी हे हॅझार्डस मटेरियल व्हेईकल तयार करण्यात आले आहे.
व्हेईकलचा उपयोग कशासाठी?
कोठेही बायोलॉजिकल, केमिकल किंवा न्यूक्लिअर अटॅक झाला तर हे व्हेईकल त्या परिस्थितीत काम करु शकणार आहे. हल्ला नक्की कोणत्या स्वरुपाचा आहे, त्याची तीव्रता किती आहे, हे या व्हेईकलच्या वर बसवलेल्या एंटीनांच्या सहाय्याने तपासता येणार आहे. (Pune News) हे हल्ले परतवून लावण्याची यंत्रणा या व्हेईकलमधे असणार आहे.
व्हेईकलमध्ये किती व्यक्ती काम करतील?
सुरक्षाकवच असलेल्या या व्हेईकलमध्ये सहा व्यक्ती काम करु शकणार आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्सने एनडीआरएफसाठी ही गाडी तयार केली असून, या गाडीची किंमत १५ कोटी रुपये आहे. आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ या गाडीचा उपयोग करु शकणार आहे. (Pune News) जगातील अनेक शोध हे लष्कराच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना लागले आहेत, त्यातीलच हा एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी ; कोंढवा परिसरातील घटना..
Pune News : चांदणी चौकात लावण्यासाठी नकाशे तयार; भुलभुलैयातून प्रवाशांची सुटका होणार