उरुळी कांचन : तरडे (ता. दौंड) येथील जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा टाकून ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रवि लाला सुकळे (वय-२२ ),सचिन लक्ष्मण कुरकुडे (वय-३७) बाळु शंकर काळे (वय -४५),अंकुश बाळु कोतवाल (वय-५०) राजु रामभाऊ बरकडे (वय-३२),सुरेश रामदास पवार (वय-३०) आणि नाना विलास केसकर (वय-३२, सातही रा. तरडे, ता हवेली जि- पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार नरेद्र जगन्नाथ सोनवणे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरडे येथे बेकायदा जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. म्मिलालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा वरील सातही आरोपी झुगार खेळताना रंगेहाथ आढळून आले. याप्रकरणी पोलीस हवालदार नरेद्र जगन्नाथ सोनवणे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, वरील सातही आरोपींवर महाराष्ट्र (मुंबई) जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.