Pune News : पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. अजित पवार यांच्या हस्ते १०६ फुटी ध्वजाचे लोकार्पण झाले. या वेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करतानाच भाजपसोबत जाण्याचा निर्णय योग्य होता हे लोकांना पटवून देऊ आणि टीका करणाऱ्यांना उत्तर देऊ, असे विधान केले. लोक आमच्यावर टीका टिपण्णी करत आहेत. या सर्वांना कामातून दाखवून देणार आहे, तेव्हाच त्यांना पटेल, आमचा निर्णय किती चांगला होता.
पुणे, पिंपरी आणि ग्रामीणच्या समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार
मी कामाचा माणूस आहे. कामातून लोकांना उत्तर देणार आहे. महापालिका निवडणुका अद्याप लागलेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे निवडणुका लागल्या नाहीत. शिंदे, फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. (Pune News) या संधीचे मी सोने करणार आहे. सध्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
पुणे, पिंपरी आणि ग्रामीणच्या समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार आहे. जाणीवपूर्वक कुणी चुका केल्या तर त्यांना दुसरीकडे पाठवण्यात येईल. कुणाची गय केली जाणार नाही, असंही अजित पवार यांनी सांगितले. (Pune News) झोपडपट्टी विरहित शहर करण्याचा प्रयत्न आहे. पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. राज्यात चांगले काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जातीय सलोखा ठेवण्याचा देखील प्रयत्न आम्ही काम करत आहोत. अल्पसंख्याक समाजाला असुरक्षित वाटणार नाही, याचीही काळजी घेत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आठव्या मजल्यावरून पडून बाप-लेकीचा मृत्यू..
Pune News : शाळकरी मुलीला मैत्रीच्या जाळ्यात ओढून बलात्कार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल