Sharad Pawar : कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने सत्तेचा वापर करत राज्यातील अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लावला. यामध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश होता. मात्र, ईडी कारवाईदरम्यान त्यांच्या पत्नीने धाडस दाखवले. पण कुटुंबप्रमुख असलेले मंत्री मुश्रीफ भाजपसोबत गेले अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील जाहीरसभेत केली.
जाहीरसभेत टीका
सत्तेचा गैरवापर करत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक, खासदार संजय राऊत या नेत्यांच्या मागे ईडी लावली. मात्र, हे नेते घाबरले नाहीत तर त्यांनी कारवाईचा सामना केला. आज अनिल देशमुख आमच्यासोबत आहेत. मात्र, मंत्री मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धार पडल्यानंतर त्यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी आम्हाला गोळ्या घाला. मात्र, मागे ईडीची पीडा नको, अशी माध्यमांसमोरच भूमिका मांडली होती.
या घटनेचा संदर्भ देत शरद पवार यांनी ईडीची कारवाई झालेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरातील सदस्यांनी ईडीचा सामना केला. मात्र, कारवाई टाळण्यासाठी मंत्री मुश्रीफ भाजपसोबत गेले अशी जाहीरसभेत टीका केली.