Pune News : पुणे : पुणे ग्रामीण डाक विभागाअंतर्गत मावळ तालुक्यातील चावसर आणि मोरवे या गावात दोन स्वतंत्र नवीन शाखा डाकघरांचे उद्घाटन पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune News)
नवीन खाती उघडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य
चावसर शाखा डाकघराच्या उद्घाटनप्रसंगी नवनाथ कुदळे, सरपंच चावसर, भाऊसाहेब काळवीट, माजी सरपंच, संतोष राऊत उपसरपंच चावसर, एस.डी. मोरे, सहायक अधीक्षक (मुख्यालय) पुणे ग्रामीण विभाग, गणेश वडूरकर, सहायक अधीक्षक ग्रामीण पश्चिम उपविभाग आणि विभागीय कार्यालय, पुणे ग्रामीण विभागाचे कर्मचारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. तर मोरवे शाखाडाकघराच्या उद्घाटनप्रसंगी अप्पासाहेब भानवसे, ग्रामसेवक, लालासाहेब वांजळे पाटील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. (Pune News)
कार्यक्रमादरम्यान एरंडे यांनी विविध टपाल बचत योजना आणि ग्रामस्थांच्या जीवनातील त्यांचे महत्त्व विशद केले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून, शाखा शाख डाकघरामार्फत आधार नोंदणी आणि अद्यतनासह सर्व DBT लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचवले जातील, असेही त्यांनी सांगितले. (Pune News)
दरम्यान, भारत सरकारच्या आर्थिक समावेशन योजनेंतर्गत पुणे ग्रामीण विभागामध्ये एकूण 11 नवीन शाखा डाकघर मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याशृंखले अंतर्गत आजपर्यंत एकूण तीन शाखाडाकघर सुरु करण्यात आलेली आहेत, त्यापैकी चावसर आणि मोरवे शाखा डाकघराचे उद्घाटन आज पार पडले. (Pune News)
उद्घाटन कार्यक्रमावेळी नवनाथ कुदळे यांनी चावसर गावात नव्याने सुरू झालेल्या शाखा शाखाडाकघरामध्ये सर्व प्रकारची नवीन खाती उघडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.