Pune News : पुणे : शहरात फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. ग्राफोलॉजी व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. दुबईतील ग्राफोलॉजी कौशल्याबाबतचे व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यावर व व्यवसायातील खर्चासाठी तब्बल १७ लाख २५ हजार रुपये खर्च करण्यास भाग पाडले आणि परतावा न देता, घोर फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच पुण्यातील बी. टी. कवडे रोड परिसरात उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश अच्युतन नायर (वय ४६, रा. वाघोली) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनिष पांडे (रा. शिवानंद गार्डन, वानवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बी. टी. कवडे रोड परिसरातील प्रकार
मनिष पांडे याने फिर्यादीला ग्राफोलॉजी व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. बी. टी. कवडे रोड येथे ग्राफोहब प्रायव्होट लिमिटेड कंपनीचे ऑफिस सुरु केले. फिर्यादीचा विश्वास संपादन करुन (Pune News) त्यांना दुबईतील ग्राफोलॉजी कौशल्याबाबतचे व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यावर व व्यवसायातील खर्चासाठी १७ लाख २५ हजार रुपये खर्च करण्यास भाग पाडले. परताव्याच्या आशेने फिर्यादीने एवढी मोठी गुतवणूक केली.
मात्र, अनेक दिवस वाट पाहिल्यानंतरही संबंधित व्यक्तीने गुंतवणुकीवर परतावा न दिल्याने, फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. (Pune News) त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. हा प्रकार जून २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान बी. टी. कवडे रोड व साई राधे बिल्डिंग येथे घडला.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनवडे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘हे हडपसर गाव आहे, इथं गुन्हेगारी चालते…’ रीलमधून तरुणाचे पोलिसांनाच आव्हान…
Pune News : धक्कादायक! पुण्यात तब्बल एक कोटीचा ड्रगचा साठा जप्त