Pune News : पुणे : पुणे शहरात मिळणारे अंमली पदार्थ हा चिंतेचा विषय झाला आहे. पुणे पोलिसांनी नुकताच गोकुळनगर भागातून सुमारे १ कोटी रुपयांचा आफिम जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. राजस्थानच्या टोळीकडून शहरात अफीमचा साठा जप्त केला आहे.
राजस्थानच्या टोळीतील तिघांना अटक
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत या तिघांना अटक करण्यात आली आहे. शहरातील गोकुळनगर भागात ही कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना, कात्रज भागात कात्रज-कोंढवा रोडवर एक व्यक्ती अफिमची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकला आणि सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. (Pune News) त्याच्याकडून घटनास्थळावरुन ६४ लाख २८ हजार रुपये किंमतीचे ३ किलो २१४ ग्रॅम अफीम जप्त करण्यात आले. याबाबत अधिक तपासणी केली असता, हे अफिम चावंडसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुमेर बिष्णोई याच्याकडेही अफिमचा साठा असल्याचे त्याने कबुल केले. (Pune News) त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पुणे पोलिसांना आरोपींकडून १ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ मिळाले.
या अंमली पदार्थांची विक्री ते कोठे करणार होते, त्यांच्याकडे अंमली पदार्थांचा अधिक साठा आहे का, याची माहिती पोलिसांच्या तपासानंतर उघड होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अनैतिक प्रेमसंबंधातून कोंढव्यात मुलाला जीवे मारण्याची धमकी
Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात शेषनागाची फुलांची सजावट
Pune News : कोरेगाव पार्कमध्ये धुम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र हिसकावले