Pune News : पुणे : गेल्या काही दिवसांपासून हनीट्रॅपचे प्रकरण समोर येताना दिसत आहे. त्यात आता वारजे पोलिसांनी धडक कारवाई करत अवघ्या 24 तासांच्या आतच तीन आरोपींना गजाआड केले. तक्रारदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवून जबरदस्तीने 50 हजार रुपये खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. हा प्रकार बुधवारी (दि.16) वारजे माळवाडी येथील स्वर्णा हॉटेल येथे घडला होता.
वारजे माळवाडी येथील प्रकार
फेसबुक अकाउंटवरुन बुधवारी (दि.16) मनीषा जी या महिलेचा फोन आला. या महिलेने फिर्यादी यांना वारजे माळवाडी येथील स्वर्णा हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावून घेतले. फिर्यादी हॉटेलमध्ये गेले असता आरोपींनी संगनमत करुन ते सायबर पोलिस असल्याचे सांगितले. (Pune News) मुलींना ट्रॅप करतो, त्यांचे व्हिडिओ काढतो, असे म्हणत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तसेच शिवीगाळही केली. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नाहीतर हे पैसे एटीएममधून काढण्यासाठी दबाव टाकला. याची तक्रार जेव्हा पोलिसांत देण्यात आली तेव्हा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींना अटक केली.
भरत बबन मारणे (वय-45 रा. रामनगर, वारजे, पुणे) ,अक्षय राजेंद्र जाधव (वय-48 रा. कर्वेनगर, पुणे), शिवाजी गोविंदराव सांगोले (वय-34 रा. नऱ्हे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी (Pune News) वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. बी. ओलेकर करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खंडणी उकळण्यासाठी तिने हॉटेल व्यावसायिकालाच ओढले जाळ्यात…
Pune News : ढोल-ताशांच्या गजरात पुण्यात केसरी गणेशोत्सवाला प्रारंभ; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल