पुणे : घरगुती कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत तडीपार केलेल्या गुंडाचा खून करण्यात आला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. वानवडी परिसरातील सय्यदनगरमध्ये गुरूवारी (ता. १७) हि घटना घडली आहे.
आजीम शेख उर्फ अंत्या (वय- ३५) असू खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. आजीम याला पुणे पोलिसांनी तडीपार केले होते. तरीही तो घरी आला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आजीम याला पुणे पोलिसांनी तडीपार केले होते. तरी देखील तो पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सय्यदनगरमध्ये आला होता. घरगुती कारणावरून आजीम आणि त्याच्या विरूध्द गटांमध्ये वाद भडकला आहे. त्यामध्ये आजीमचा खून झाला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर दोघांची बोटे छाटण्यात आली आहेत अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झालेले आहेत.