नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत लुसाने डायमंड लीगमध्ये विजेतेपद पटकावलं आहे. लुसाने डायमंड लीग जिंकणारा निरज चोप्रा पहिला भारतीय आहे. हंगेरीतील बुडापोस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही तो पात्र ठरला आहे.
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने दुखापतीतून सावरत दमदार पुनरागमन केले आहे. दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरजने दमदार पुनरागमन करत अनेकांची मनं जिंकली आहेत. भालाफेकपटू नीरजने ऐतिहासिक डायमंड लीग स्पर्धेत शुक्रवारी 89.08 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
हे विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. या विजेतेपदासह नीरजने झुरिच येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजने अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८८.१३ मीटर फेक करून ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. ज्यात खेळताना त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. मात्र दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरजने दमदार पुनरागमन करत अनेकांची मनं जिंकली आहेत.
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भालाफेक केला. ज्यापर्यंत इतर खेळाडूंना स्पर्श करणे कठीण आहे. यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटर भालाफेक केली यानंतर त्यानंतर त्यानं तिसरा थ्रो केलाच नाही. त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचव्या प्रयत्न देखील केला नाही. त्यामुळे पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं.