Indapur News : पुणे : इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ येथील डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप यांनी दिल्ली येथील गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठात एम. डी. मेडिसिनमध्ये प्रथम श्रेणी मिळवत, दुसरा क्रमांक पटकावला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील मुलाने मिळवलेल्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे. Indapur News
एका छोट्याशा खेड्यातील मुलाने मिळवलेल्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक….
डॉ. अनिकेत जगताप यांचे वडील बापूसाहेब जगताप आणि आई नेत्रप्रभा जगताप पीडीसी बँकेत कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदापूर येथील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील बी. एच. चाटे ज्युनियर कॉलेजमध्ये झाले. नी सी.ई.टी परीक्षा देऊन मुंबई येथील लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन हॉस्पिटल येथे एम.बी.बी.एस.साठी प्रवेश घेतला.
नीट, पी.जी परीक्षा देऊन त्यांनी उच्च शिक्षणासाठी दिल्ली येथील वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज अँड सफदरगंज हॉस्पिटल येथे एम.डी. मेडिसिनसाठी प्रवेश घेतला. डॉ. अनिकेत जगताप यांनी जून २०२३ मध्ये मास्टर डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठातून त्यांनी एम.डी. मेडिसिनमध्ये प्रथम श्रेणीत पास होत, द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
जगताप यांनी एम.डी. मेडिसिन पदवी प्राप्त करीत जगताप कुटुंबियांचे नाव उंचावल्याबद्दल विधीतज्ञ भारत जगताप, अमित जगताप यांनी त्यांचे कौतुक केले. इंदापूर आणि कालठण नं. १ येथील जगताप कुटुंबिय, ग्रामस्थ तसेच मित्र परिवाराने देखील त्यांचे भरभरून कौतुक केले. या यशात माझे वडील बापूसाहेब जगताप, आई नेत्रप्रभा जगताप यांच्यासह संपूर्ण जगताप कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप अभिमानाने सांगतात. Indapur News