Pune News : पुणे : पोलीस होण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी कोण काय करेल सांगता येत नाही. एकाने तर पोलीस शिपाईपदी भरती होण्यासाठी भुकंपग्रस्त नसतानाही भुकंपग्रस्त असल्याची बनावट कागदपत्रे सादर करुन, भुकंपग्रस्त कोट्यातून पोलीस भरती होऊन शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई गोविंद मधुकर इंगळे असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. (Pune News) सध्या त्याची नेमणूक शिवाजीनगर मुख्यालयात आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रविण संपतराव अब्दागिरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई भरती करण्यात आली होती. त्यावेळी गोविंद इंगळे याने भुकंपग्रस्त कोट्यातून अर्ज केला होता. (Pune News) या भरतीत त्याची निवड होऊन तो कामावर रूजू झाला.
दरम्यान, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यावर त्याने बनावट कागदपत्रे सादर करुन भुकंपग्रस्त कोट्यातून नोकरी मिळविल्याचे आढळून आले. (Pune News)याप्रकरणी शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नाईक या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चोरट्यांची कमाल! दागिन्यांसोबतच कारची चावी चोरून, पार्किंगमधील कारही लांबविली…
Pune News : दिल्लीहून विमानाने पुण्यात येऊन घरफोडी; कोंढव्यात दोघांना अटक; दीड लाखाचे दागिने जप्त