Pune News : पुणे : पतीने घेतलेले कर्ज दिले नाही म्हणून एका खासगी सावकाराने पती समोरच पत्नीवर बलात्कार केला. या घटनेचा व्हीडीओ त्याने सोशल मिडीयावर व्हायरल केला. या हादरवून टाकणाऱ्या प्रकारानंतर अशीच एक घटना पुन्हा एकदा शिक्षणाचे माहेर घर आणि सुस्कृंत शहर म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरातच घडली आहे. ब्ल्यु फिल्म दाखवून त्याप्रमाणे अनैसर्गिक संभोग केल्यावर पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावले. एवढ्यावरच न थांबता त्या विक्षिप्त पतीने या प्रसंगाचे शुटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी नराधम पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Pune News)
पोलिसांनी नराधम पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी ३१ वर्षांच्या पत्नीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर नराधम पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा विवाह २०१५ मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून पतीचे वागणे विक्षिप्त व तऱ्हेवाईक असल्याचे त्यांना जाणवत होते. फिर्यादीचा पती त्यांना अश्लिल चित्रफित दाखवत असे. तसेच त्याप्रमाणे अनैसर्गिक पद्धतीने संभोग करण्यास भाग पाडत असे. संभोगानंतर विवस्त्र अवस्थेत नाचायला लावून त्याचे चित्रीकरण करत असे..(Pune News)
दरम्यान, या प्रकारामुळे पत्नी संतप्त झाली होती. फिर्यादीने विरोध या प्रकाराला विरोध केल्यावर ते चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देखील पती देत असे. या घटनेनंतर त्रासलेली पत्नी माहेरी निघून गेली. त्यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने फिर्यादीवर पुन्हा अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीची बहिण काम करत असलेल्या ठिकाणी ती सेक्स रॅकेट चालवित आहे, अशा आशयाचे पत्र पाठवून तिची देखील बदनामी केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे..(Pune News)
या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत.(Pune News)