Pune News पुणे : वाघोली येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा विद्यार्थी विशाल कठारे याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांमध्ये असाधारण उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन विशाल कठारे यास गौरविण्यात आले. (Pune News)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विशाल कठारे याचा शुक्रवारी (दि.4) सत्कार समारंभ झाला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, मॅनजमेंट कौंसिल मेंबर रवींद्र सिंगनापूरकर, मॅनेजमेंट कौंसिल मेंबर बागेश्री मंठाळकर , वित्त व लेख अधिकारी चारुशीला गायके, प्राचार्य नितीन घोरपडे, प्राचार्य देविदास वायदंडे , डॉ. संदीप पालवे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रभारी संचालक डॉ. सदानंद भोसले, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. प्रशांत धुतेकर, कमल उके यांच्यासह पुणे विद्यापीठातील अन्य मान्यवर उपस्थित होते. (Pune News)
जी. एच. रायसोनीचे डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल विशाल कठारे यांचे अभिनंदन केले. केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे तर समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे असे अपवादात्मक विद्यार्थी आहेत. असे म्हणत डॉ. खराडकर यांनी विशाल यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन डॉ. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी आणि जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सर्व कर्मचारी यांनी विशाल कठारेच्या यशाबद्दल अभिनंदन केले. (Pune News)