Pune News : पुणे : शिक्षक म्हणून काम करत असताना फक्त शालेय घडामोडीवर लक्ष न ठेवता. विद्यार्थी परीपुर्ण घडला पाहिजे वेळ प्रसंगी त्याला मदत मिळवून देऊन त्याची प्रगती जीवनाच्या यशस्वीतेला भरारी मिळवून देणारी ठरावी. असा ठाम विश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील एल. डी. उपार आणि स्वाती उपार या पती पत्नीने रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सेवानिवृत्ती नंतर ही सुरू ठेवले आहे. त्यामुळेच समाजमाध्यमातून आजही त्यांच्या कार्याचा गौरव केला जातोय.
विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या कार्याचा नेहमीच ठसा
कोल्हापूर जिल्ह्यातील या दांपत्याने पुणे जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सेवा केली आहे. रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथे एल.डी. उपार यांनी ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक म्हणून सन १९८७ ते मे २०२१ या ३४ वर्षाच्या काळात ज्ञानदानाचे कार्य केले. (Pune News)
त्यानंतर एल.डी. उपार यांची पदोन्नती झाली आणि भोळी, (ता. खंडाळा) येथे रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुलमध्ये ‘जुन २०२१ ते ३१ जाने २०२३ या काळात मुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज पाहिले. अशी एकूण त्यांनी ३६ वर्षे सेवा पुर्ण केली आहे. स्वाती उपार यांनी उपशिक्षिका, महात्मा गांधी विद्यालय, मंचर, येथे नंतर प्राचार्या म्हणून श्री शिवाजी विद्यालय धामणी येथे अशी एकूण सेवा ३३ वर्षे सेवा पुर्ण केली आहे. (Pune News)
शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना फक्त विद्यार्थी हा केंद्रबिंदू त्यांनी समोर ठेवला होता. अध्यापन करत असताना पुस्तकाबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यांनी केले आहे. नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, सांस्कृतिक नृत्य दिग्दर्शन, विद्यार्थी समुपदेशन व्याख्याने, विज्ञान प्रकल्प दिग्दर्शन, व्यवसाय मार्गदर्शन व्याख्याने, सामाजिक उपक्रम सहभाग घेऊन त्यांनी गरजू विद्यार्थी मदत कार्य सुरू ठेवले होते. त्यामुळे अद्यापना बरोबर विद्यार्थ्यांची आर्थीक परिस्थिती कशी सुधारेल, याकडे त्यांनी लक्ष दिले होते. (Pune News)
वर्गातील, गरजु, आर्थिक दुर्बल घटकातील मुला मुलीचा शोध घेऊन, त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांच्या घरी भेट देऊन परिस्थितीची पहाणी करीत असते. त्यानंतर विविध सामाजिक संस्था (NGO), शिक्षण प्रेमी, यांचे तर्फे शैक्षणिक मदत मुलांचे बँक खात्यावर जमा करून दिली. आज अखेर २७ लाख रुपये आंबेगाव तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना मिळवून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या कार्याचा नेहमीच ठसा राहिला आहे. (Pune News)
दरम्यान, सामाजीक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे तर्फे दोन अनाथ मुलांना शैक्षणिक मदत मिळण्यासाठी त्यांचे कार्य मोलाचे ठरले आहे. शैक्षणिक, सामाजिक व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत बाबत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Pune News)
आमचे मार्गदर्शक शिक्षक माजी आमदार
कै. शिवाजीराव बेंडे पाटील
या पतीपत्नीचा विवाह १९ जुलै १९९० रोजी झाला. स्वाती उपार या रयत मध्ये कोल्हापूर जिल्हयात शिक्षिका होत्या. पुढे मंचर येथे बदली झाली. शिक्षक माजी आमदार कै. शिवाजीराव बेंडे पाटील हे त्यांना मानस पुत्र व कन्या असे नाते होते. त्यांच्या पत्नी लिलाताई पाटील यांचेही आमच्यावर प्रेम होते. ते दोघे जरी हयात नसले तरी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही शैक्षणिक कार्यात भरीव कामगिरी करू शकलो. लवकरच मंचर येथे… विद्यार्थी समुपदेशन केंद्र सुरू करणार आहोत. सेवानिवृत्त झालो असलो तरी देखील गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे करत राहणार असल्याचे या पती पत्नीने सांगितले.
मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे;-
आंबेगाव पंचायत समिती- गुणवंत शिक्षक पुरस्कार,
पुणे जिल्हा परिषद – आदर्श शिक्षक पुरस्कार,
रोटरी क्लब ऑफ मंचर – शै.व सामाजिक
आंबेगाव भुषण पुरस्कार,
माणूस परिवार मंचर- शैक्षणिक कार्याबद्दल,
संकेत कला क्रीडा अकादमी, पुणे = आदर्श शिक्षक,
मणिभाई देसाई ट्रस्ट उरळीकांचन = शैक्षणिक व सामाजिक कार्य,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार- बारामती,
साई ज्ञानदिप संकल्प, मुंबई = भारतीय प्रतिभा सन्मान पुरस्कार,
स्व. माजी आमदार शिवाजीराव पाटील – जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार,
विद्यार्थी, ग्रामस्थ तर्फे = कर्तव्यदक्ष, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार,
भारतीय जैन संघटना, शांतीलाल मुथा