Pune News : पुणे : पुण्यात क्रिकेट खेळताना तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगाराला चांगलाच दणका दिला आहे. कठोर पावले उचलत सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई
गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते याने पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने एका तरुणावर गोळीबार केला होता. या प्रकरणाचा पोलीस शोध घेत होते. पोलिसांनी सातपुते आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. (Pune News ) मकोका दाखल केल्याची ही ४२ सावी कारवाई आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ओंकार उर्फ टेड्या उमेश सातपुते (वय २३), वीर फकिरा युवराज कांबळे (वय २२, दोघेही रा. शिवणे, वारजे माळवाडी) यांच्यासह त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांवर कारवाई करण्यात आली असून, सातपुते याला अटक करण्यात आली आहे.
रामनगर येथील जय भवानी चौकात तक्रारदार तरुण मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. तेव्हा आरोपींनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. (Pune News )या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी वारजे पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. सातपुते आणि कांबळे यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, सातपुते हा दरोडा, शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी आणि पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे गुन्हे वारंवार करीत असल्याने त्याच्यावर ‘मकोका’ कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’ पुणे विमानतळावरील महिलेचा दावा; सुरक्षा यंत्रणेचे धाबे दणाणले!