पुणे : हवेली तालुका वगळून सर्वत्र ११ गुंठे क्षेत्राचे खरेदी खते सुरू आहेत. तरी हवेली ताल्याक्यातील खरेदीखत बंद आहेत ती सुरु करावी अशा मागण्यासाठी भाजपा हवेली तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवीन प्रशासकीय इमारत कौन्सिल हॉल (विधानभवन) येथे गुरुवारी (ता. २५) बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
मुद्रांक व नोंदणी विभागाने तुकाडाबंदी व तुकडाजोड कायदा १९४७ नुसार राज्यातील ११ गुंठे जमीनीचा तुकडा पाडून विक्री करण्यास अथवा जमिनीची रजेस्ट्री करण्यावर प्रतिबंध घातला आहे. या आदेशावर औरंगाबाद खंडपीठाने मुद्रांक व नोंदणी विभागाचा परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरहि फक्त हवेली तालुका वगळून सर्वत्र ११ गुंठे क्षेत्राचे खरेदी खते सुरू आहेत. तरी हवेली ताल्याक्यातील खरेदीखत बंद आहेत ती सुरु करावी अशा मागण्यासाठी हे उपोषण सुरु केले आहे.
यावेळी सदर ठिकाणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, लोणी काळभोरचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर, थेऊरचे सरपंच नवनाथ काकडे, मांजरीचे सरपंच स्वप्नील उंद्रे, विपुल शितोळे, भाऊसाहेब थिटे, विजय जाचक, शरद आव्हाळे, श्रीमंत झुरुंगे, रूपेश शिवले, विशाल गुजर, प्रदीप सावंत आदीनी यावेळी भेट दिली आहे. मात्र अजूनही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आले नसल्याची माहिती भोंडवे यांनी दिली.
दरम्यान, हवेली तालुक्यात विशिष्ठ हेतूने हा निर्णय लागू असून तालुक्यामध्ये तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा २५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा भाजप हवेली तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे यांनी दिला होता.