पुणे : तुकडाबंदी कायद्याला फाट्यावर मारत विश्रांतवाडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाने दोन दिवसातच तब्बल ३३ हुन अधिक नियमबाह्य दस्तांची नोंदणी केल्याची चर्चा आहे. एका गुंठ्यामागे ५० ते ६० हजार रुपयांची माया घेतल्याचा संशय असुन, ३०० बेकायदा गुंठ्यांच्या विक्रीपोटी सुमारे दिड कोटी रुपयांची माया घेऊन, वरिष्ठ लिपिक गायब झाल्याचे पुढे आहे.
अमित अविनाश राऊत (रा. पिंपरी) असे त्या तुकडाबंदी कायद्याला फाट्यावर मारणाऱ्या वरिष्ठ लिपिकाचे नाव असुन, त्याने वाघोली. वडकी, तळेरानवाडी, केसनंद, लोणीकंद, लोणी काळभोर असा विविध गावातील जागेंचे बेकायदा दस्त व नोंदणी केल्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयाने केलेल्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तुकडाबंदी कायदा लागु असल्याने, मागिल कांही दिवसापासुन हवेली तालुक्यातील बेकायदा दस्त नोंदणी पुर्णपणे बंद झाली होती. नोंदणी व्हावी यासाठी प्लॉटींगवाले हवेलीमधील विविध दुय्यम निबंधक कार्यालयाचे उंबरे झिझवत होते. याच दरम्यान ऑगस्ट महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात विश्रांतवाडी येथील सह दुय्यम निबंधक हवेली आठ क्रमांक कार्यालयाचा चार्ज अमित राऊत यांच्याकडे आला होता. हा चार्ज मिळताच, राऊत यांनी प्लॉट धारकांना बोलावून बेकायदा ३३ हुन अधिक नियमबाह्य दस्तांची नोंदणी केली. आणि प्रत्येक बेकायदा गुंठ्यामागे पन्नास ते साठ हजार रुपयांची माया घेऊन, त्याने तीनशेहुन अधिक गुंठ्यांची विक्री केल्याची चर्चा आहे.
दरम्यान नोंदणी उपमहानिरीक्षकांनी ८ ऑगस्ट ला झालेल्या कांही दस्तांची तपासणी केल्यावर, ८ ऑगस्ट २०२२ रोजी राऊत यांनी वैयक्तिक आर्थिक लाभासाठी तुकडेबंदी संदर्भातील कायद्यांचे, नियमांचे उल्लंघन करून एका दिवसात २४ दस्तांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. तसेच त्यात साडेतेरा लाख रुपये मुद्रांक शुल्क कमी आकारल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लिपिकाला निलंबित करून त्याने केलेल्या दस्तांची नोंदणी विशेष पथकाकडून तपासण्याची शिफारस उपमहानिरीक्षकांनी नोंदणी महानिरीक्षकांना केली आहे.
दरम्यान विश्रांतवाडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाप्रमानेच मागिल सहा महिण्याच्या काळात हवेलीमधील विविध दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमानात बेकायदा बेकायदा दस्त नोदणी झाल्याचा आरोप केला आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयाने हवेलीमधील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात मागिल सहा महिण्याच्या कालावधीत झालेल्या दस्तांची चौकश केल्यास, अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील असेही बोलले जात आहे.