Pune News : पुणे : जमिनीच्या वादातून मावळात दादागिरी केल्याप्रकरणी पौड पोलिसांनी ताब्यात घेतलेला हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यासह ६ जणांना शिवाजीनगर कोर्टाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(Pune News)
पिस्तूलाचा धाक दाखवून धारधार हत्याराने वार करून जीवघेणा हल्ला.
धनंजय उर्फ भाई जयराम देसाई (वय ४५), रोहित संजय काकतकर (वय २९), श्याम विलास सावंत (वय २९), निखील आनंद आचरेकर (वय ३८), सुरज रमेश मेहरा (वय २३), कुणाल आनंद निकम (वय २२, सर्व रा. परमाल बंगला, विठ्ठलवाडी, पौड) अशी कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली आहे.(Pune News)
याप्रकरणी प्रदिप शिवाजी बलकवडे वय- ३५, व्यवसाय-शेती रा. दारवली, ता. मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार दिली होती.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारवली ता. मुळशी ग्रामपंचायत हद्दीत प्रदीप बलकवडे व त्यांचे कुटुंबीय राहतात. तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेजारीच धनंजय देसाई याची जमीन आहे. जमीन देण्यासाठी त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून देसाई याच्याकडून दबाव टाकण्यात येत होते. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रदिप बलकवडे हे गावातील सचिन संभाजी ठोंबरे यांचे घरात बसले होते.(Pune News)
यावेळी हिंदूराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष धनंजय देसाई व त्याच्या समर्थकांनी जमीन लिहून देण्यासाठी शेतकरी प्रदिप बलकवडे या तरुण शेतकऱ्यावर दबाव टाकला. तसेच पिस्तूलाचा धाक दाखवून धारधार हत्याराने वार करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात धनंजय देसाईसह १० ते १५ जणांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Pune News)
दरम्यान, या प्रकरणी पौड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, धनंजय देसाईसह सहा जणांना अटक केली होती. पुणे पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह त्याच्या साथीदारांना कोर्टात हजर केले. कोर्टाने देसाई याच्यासह अटकेत असलेल्या सहाही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव करीत आहेत.(Pune News)