Pimpri News : पिंपरी : राज्यातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प , सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ हजार घरांची निर्मिती होत आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातून 3 हजार नागरिक तसेच लाभार्थी हजेरी लावणार आहेत. अशी माहिती भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन आणि डूडूळगाव व सेक्टर- १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच, बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातून खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिकनगरी आहे. उद्योगधंद्यांच्यानिमित्ताने या शहरात राज्याच्या विविध भागातून नागरिक कामानिमित्ताने स्थायिक झाले. या कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकारने महापालिकांना पाठबळ दिले. (Pimpri News ) प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबवली.
बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १२८८ सदनिका उभारण्यात आल्या आहेत. यांचे लोकार्पण व डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने ११९० सदनिका उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यापैकी बोऱ्हाडेवाडीतील १२८८ घरांचा चावी वाटप कार्यक्रम आणि डुडूळगाव व प्राधिकरण सेक्टर-१२ मधील प्रकल्पाचा भूमिपुजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.
आवास योजनेतील लाभार्थी याशिवाय शहरातील नागरिक, भाजप पदाधिकारी अशा तीन हजार जणांची या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती असणार आहे. यासाठी सर्व बूथ कमिटी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पिंपरी चिंचवड शहरातील कचरा मोशी कचरा डेपो मध्ये टाकण्यात येत आहे. साधारण 1991 मध्ये कचरा डेपोची अधिकृत घोषणा करण्यात आली मात्र यानंतर कचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाय योजना न झाल्यामुळे सध्या या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत यामुळे दुर्गंधीचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो.
वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे एकीकडे वीज निर्मिती होणार आहे याशिवाय कचऱ्याचे डोंगर हटविण्यास देखील मदत होणार आहे.(Pimpri News ) हा एक प्रकारे संपूर्ण शहरवासीयांनाच दिलासा असून यापुढेही नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊनच चांगले उपक्रम राबवले जाणार आहेत असे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले.
शहरात मेट्रो सुसाट: पुणे ते पिंपरी अंतर होणार अवघ्या 22 मिनिटांमध्ये पार
पुणे मेट्रो टप्पा १ च्या काम पूर्ण झालेल्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी दुपारपासून पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट आणि डेक्कन जिमखाना ते रुबी हॉल या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रोसेवा सुरु होणार आहे. मेट्रोमुळे पुणे रेल्वे स्थानक येथून पिंपरी येथे येण्यासाठी अवघे 22 मिनिट लागणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट (6.91 किलोमीटर), गरवारे महाविद्यालय ते सिव्हील कोर्ट (2.38 किलोमीटर), सिव्हील कोर्ट ते रुबी हॉल (2.37 किलोमीटर) या तीन मार्गांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असणार आहे. या सर्व मार्गांसाठी सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन हे इंटरचेंज असणार आहे. यामुळे वनाज ते पिंपरी-चिंचवड आणि रुबी हॉस्पिटल ते पिंपरी-चिंचवड तसेच वनाज या मार्गावर मेट्रोने प्रवास करता येणार आहे. लोकार्पण झाल्यानंतर सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रो सुरु झाल्यानंतर पुणे ते पिंपरी हे अंतर अवघ्या 22 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. सध्या पुणे मेट्रोच्या सेवेत 18 मेट्रो रेल्वे दाखल झाल्या आहेत.
शहराच्या विकासाच्या मापदंडाला वेगळी उंची मिळाली
एकीकडे शहरातील आपल्याच बांधवांना हक्काचा निवारा देत असताना दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन “वेस्ट टू एनर्जी”सारखा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. ही गोष्ट शहराच्या विकासाच्या मापदंडाला वेगळी उंची देणारी आहे. शहर नियोजनाची पुढील पन्नास वर्षे लक्षात घेता नागरिकांना हक्काचे घर, त्यांचे आरोग्य आणि मेट्रोसारखा उपक्रम शहरात सुरू होत आहे यातून सार्वजनिक वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. शहर नियोजनाच्या दृष्टीने या गोष्टी अत्यंत उपयुक्त असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामध्ये आपल्या शहराला या गोष्टींचा लाभ मिळत असून ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.
शंकर जगताप
(शहराध्यक्ष – भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : संतापजनक! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडने वार; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना…!
Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले डेंग्यूचे २७ संशयित रुग्ण; ७३८ आस्थापनांना नोटीस!