Yavat News : यवत, (पुणे) : राहू (ता. दौंड) येथील एका परप्रांतीय कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकून फरार असलेल्या आरोपीला यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Yavat News
भोला उर्फ जया जंगलाप्रसाद कुमार (आराहरा ता. वाराणसी जि. बनारस, राज्य उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Yavat News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहू येथील सोनवणे डेअरी फार्म परिसरात सोमवारी (ता. २४) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका विहरीत भिमकुमार अनिल यादव (वय ३० वर्ष रा. जयपुर तहसील मेहंदीया, जिल्हा आरवल राज्य बिहार) या परप्रांतीय कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह हा विहरीत आढळून आला होता. तसेच मयत हा विजय उर्फ रामराव शहाजी सोनवणे यांच्या राहु येथील म्हशीवरील कामगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. Yavat News
सदर घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तसेच यवत पोलीस ठाण्यातील पोलीस करीत असताना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजसह परिसरात सखोल चौकशी करत असता शोध पथकाला सदरचा खून हा सोनवणे यांचे म्हशीचे मोठयावर काम करणारा भोला उर्फ जया जंगलाप्रसाद कुमार याने केला असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने भोला कुमार यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. आरोपीला दौड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, प्रशांत मदने, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, सचिन माडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे अजित भुजबळ , रामदास जगताप, चांदणे, अजित काळे, अमित यादव, बाराते यांचे पथकाने केली आहे.