Pune News : पुणे : पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती. पुण्यात आयसिसशी संबंधित असलेल्या दोघांना अटक केल्यानंतर राज्यभरात एटीएसने कारवाई सुरू केली आहे. अटक केलेले दोघे शहरात दीड वर्षांपासून राहत होते. हे दोघेही दहशतवादी जयपुरात सीरियल ब्लास्ट प्रकरणातील होते. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तब्बल दीड वर्षांपासून ते पुणे शहरात राहत असतानाही पोलिसांना थांगपत्ता लागला नव्हता. एका मोटारसायकल चोरी प्रकरणाची चौकशी करताना मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३) आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी (वय २४) हे दोघे सापडले. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला होता.(Pune News)
आर्थिक पुरवठा केल्या प्रकरणात एकाला अटक.
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा देणाऱ्या कोंढवा येथील एकास दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पठाण कोंढवा भागात वास्तव्य करत असून त्याचा ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे. या दोघांना कोंढवा येथे घर देणारा अब्दुल पठाण याला एटीएसने शुक्रवारी अटक केली होती. पठाण याने फक्त त्यांना घरच दिले नाही तर ग्राफिक डिझाईनचे कामही दिले. त्या कामासाठी त्यांना तो आठ हजार रुपये मासिक पगार देत होता. तसेच या दोघ दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा करणारा आणखी कोण आहे? याचा शोध एटीएस घेत होते.(Pune News)
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी यांना आर्थिक पुरवठा केल्या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. शनिवारी एटीएसने त्याला रत्नागिरीहून चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर दहशतवाद्यांशी त्याचा संबध असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे एटीएस त्याला अटक केली. या प्रकरणात एटीएसने केलेली ही चौथी अटक आहे. शिवाय परराज्यात एका संशयिताला नोटीस बजावण्यात आली आहे.(Pune News)
युसूफ खान आणि याकुब साकी याच्यासोबत असणारा तिसरा आरोपी शहानवाज आलम अजूनही फरार झाला. एटीएसकडून त्याचा शोध सुरु आहे. आलम याने या दोघांना लॉजिस्टिक मदत केली होती. त्याला लवकरच अटक होईल, असा विश्वास एटीएसकडून व्यक्त केला जात आहे.(Pune News)