गणेश सुळ
Daund News : केडगाव, (पुणे) : दौंड तालुक्यातील पारगाव येथे पुन्हा एकदा स्फोटकांच्या सहाय्याने इंडिया वन कंपनीचे एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याची दुसरी वेळ असून यावेळीही तीच पद्धत अवलंबवली गेली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. Daund News
याप्रकरणी किशोर निंबाळकर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Daund News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव येथील इंडिया वन कंपनीचे एटीएम स्फोटके लावून उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र नागरिकांची चाहूल लागल्याने अज्ञात चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. तसाच प्रकारे बुधवारी (ता. २६) रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास एटीएम ला स्फोटके लावून ते फोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मात्र यावेळीही लोकांची चाहूल लागल्याने तीन अज्ञात चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा यशस्वी झाले आहेत. दोन वेळा एकसारखा चोरीचा प्रयत्न केला असल्याने संपूर्ण परीसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या अगोदर राज्याच्या विविध भागांमध्ये एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी वेगवेगळी शक्कल लढविल्याचे पाहण्यात आले होते. Daund News
दरम्यान, जेसीबी मशिनच्या सहाय्याने एटीएम फोडणे, स्कॉर्पिओ गाडीला दोरी च्या सहाय्याने एटीएम मशीन बांधून ते तोडून घेऊन जाणे, तसेच तलवार, हत्यारांच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या घटना घडल्यानंतर आता स्फोटकांच्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातील पैसे चोरण्याचा नवीन फंडा चोरट्यांनी शोधून काढल्याचे दिसत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कापरे करीत आहेत. Daund News