संदीप टूले
ZP School News : दौंड, (पुणे) : पूर्वी जिल्हा परिषद शाळा ही शिक्षणाचा आत्मा म्हणून ओळखला जायचा पण त्याच जिल्हा परिषदेच्या शाळावर आजचा घडीला शेवटची घटका मोजण्याची वेळ आली आहे. याला मुख्य कारण म्हणजे पालकांची बदललेली विचारसरणी व मानसिकता, कारण प्रत्येक पालकांना आपलं पाल्य इंग्रजी मीडियमच्या शाळेत पैसे खर्च करून घालायचचे असते. ZP School News
पण ते हे विसरलेत की जे पालक आज मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हट्ट करतायत तेच एकेकाळी याच जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलेत. तसेच आज जे काही प्रशासनात उच्च पदावर काम करणारे आधिकारी ते जवळपास ९० टक्के जिल्हा परिषद शाळेतून शिकूनच आधिकारी झालेत. आज प्रश्न केवळ जिल्हा परिषद शाळा टिकवण्याचा नाही तर महाराष्ट्रातील एकूणच शालेय शिक्षणाचा दर्जा टिकवण्याचा आहे. ZP School News
जो टिकवण्याची जबाबदारी पूर्णपणे राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या खांद्यावर आहे. गल्लाभरू इंग्रजी शाळांवर शिक्षणाचा दर्जा टिकवण्याची ना कोणती जबाबदारी आहे ना त्यांचे त्यात काही योगदान असणार आहे. पण शिक्षणाचा आणि मराठी शाळांचा दर्जा तेंव्हाच सुधारेल जेंव्हा पालक आपल्या पालकत्वाचा दर्जा सुधारतील आणि खाजगी इंग्रजी माध्यमांच्या अशैक्षणिक अघोरी प्रकाराला शिक्षण शेत्रातून हद्दपार करतील.
या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांना मराठी ही शिक्षणाची भाषा नसल्याचे मनावर ठसवले आणि जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलांना घालणाऱ्या उच्चशिक्षित व सधन पालकांना खाजगी इंग्रजी शाळांकडे वळवून जिल्हा परिषद शाळा म्हणजे केवळ अशिक्षित, गरीब पालकांच्या मुलांसाठी असलेली शाळा असे खोटे चित्र निर्माण केले आहे.
दरम्यान, शिक्षणाच्या बाजारीकरणाला पालकांनी ओळखून व त्याला संघटित विरोध करून आपले सुजाण व जागृत पालकत्व दाखवून देण्याची गरज आहे. कारण एकदा का जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या की या शिक्षण सम्राटांना रान मोकळे झालेच मग वाट्टेल तेवढे पैसे या शिक्षणाच्या नावाखाली उकळले जाणार आहे..त्यामुळे येणारी पाऊले पालकांनी ओळखली पाहिजे. ZP School News
याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे शिक्षक गणेश शेलार म्हणाले, “आज काही जिल्हा परिषद शाळांची जी आवस्था झालीय त्याला काही प्रमाणात मुलांचे पालकही तितकेच जबाबदार आहेत जो शिक्षणाचा दर्जा जिल्हा परिषद शाळा देऊ शकते तो खाजगी शाळा कधीच देऊ शकणार नाही. हे पालकांनी ओळखले पाहिजे.”